Share

‘महावसुली तीघडी सरकार शेतकऱ्याच्या जीवावर उठलेय? ; सरकारचे डोके कधी ठिकान्यावर येणार?’

Published On: 

पुणे : २० ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हि घटना खरंच कृषी प्रधान देशासाठी लाजिरवाणी आहे. शेतकरी धर्मा पाटील यांच्या मंत्रालयातील आत्महत्येची घटना काही वर्षांपूर्वी समोर आली होती. याच घटनेची पुनरावृत्ती आता पुन्हा एकदा घडली आहे.

दरम्यान आता समाजातील सर्वच स्तरातून यावर रोष व्यक्त केला जात आहे. तर राज्यातील नेत्यांनी याच मुद्द्याला धरून महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरून त्यांच्यावर टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे. पुण्यातील मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्ट करत ठाकरे सरकावर निशाना साधला आहे.

मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू झालेला आहे. महावसुली तीघडी सरकार शेतकऱ्याच्या जीवावर उठलेय काय? शेतकरी बांधव धर्मा पाटलांच्या मृत्यूच्या किंकाळ्या कानात गुंजत असताना सुभाष जाधवाचा मृत्यू मंत्रालया बाहेर विष पिऊन होणं हे सारं वेदनादायी नाही का? सत्तेच्या लोभापायी गरिब शेतकऱ्याची घर देशोधडीला लावणाऱ्या या महावसुली, मस्तलवाल, घराणेशाही असलेल्या सरकारचे डोके कधी ठिकान्यावर येणार ?

सुभाष जाधव यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावत, त्याच्यावर अन्याय करणाऱ्या लाल फितीतील यंत्रणा व बेजबाबदार लोकप्रतिनीधीवर कारवाई कधी होणार ?’ असे संतप्त सवाल त्यांनी ठाकरे सरकारला फेसबुकच्या माध्यमातून विचारले आहेत. तर माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी ट्वीट करून ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

‘मंत्रालय आता सरंजामदारांचा किल्ला झाला आहे का? आपल्यावरील अन्यायाची दाद मागण्यासाठी मंत्रालयाच्या दारात आलेल्या सुभाष जाधव या शेतकऱ्याला पोलीसांनी आत न सोडल्यामुळे त्यांनी किटकनाशक पिवून प्राण सोडला. काळया पैशाची तहान भागवायला, तुमची ठेकेदारी कधी धावून येणार का?’ असा संतप्त सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!