Share

“आहिल्यादेवींची जयंती हायजॅक करण्याचा प्रयत्न”; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

जेजुरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 297वी जयंती आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या अहमदनगरमधील चौंडी येथे कार्यक्रमाचे आयोजन आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. आज चौंडीत जाण्यापासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी अडवलं आहे. यावरून राजकीय वाद चांगलेच पेटले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले, “आहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडीला नेहमी कुठलाही पक्ष अभिनिवेश न ठेवता साजरी केली जाते. सर्व प्रकारचे लोक त्या ठिकाणी येतात. पण मला असं वाटतं की यावेळी सरकारी तंत्राचा उपयोग करून, या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी हायजॅक करण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. हे अत्यंत चुकीचं आहे.”

तसेच पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “राम शिंदे जे स्वत: पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांचे थेट वंशज आहेत, त्यांना देखील तिथे त्रास देण्यात आला आहे. गोपीचंद पडळकर जे खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक आहिल्यादेवींच्या विचारांवर चालातात, त्यांना अडवण्यात येत आहे. मला हे समजतच नाही की अशाप्रकारे कब्जा करण्याचं कारण काय आहे? अशाप्रकारचं पर्व हे राष्ट्रीय पर्व असतं. सगळ्यांनी मिळून साजरं करायचं असतं. पक्षाच्या पलीकडे जाऊन साजरं करायचं असतं. इथे मात्र ते हायजॅक करण्याचा प्रयत्न होतोय, तो योग्य नाही. मला असं वाटतं या संदर्भात गांभीर्याने विचार झाला पाहिजे आणि अशाप्रकारचं हायजॅकींग बंद झालं पाहिजे.”

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!