🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२मधील मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज टीम डेव्हिडची ऑस्ट्रेलियन संघात निवडीबाबत ऑस्ट्रेलियाच्या वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार अॅरॉन फिंचने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. टीम डेव्हिडने आपल्या कामगिरीने खूप प्रभावित केले असून त्याच्या नावाची नक्कीच चर्चा होईल असे तो म्हणाला.आयपीएल २०२२ मध्ये टीम डेव्हिडची कामगिरी खूप चांगली होती. मुंबई इंडियन्सकडून खेळताना टीम डेव्हिडने अनेक वेळा षटकारांच्या साहाय्याने संघाला विजय मिळवून दिला. किरॉन पोलार्डच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केल्यानंतर टीम डेव्हिडने पुढे जाऊन जबाबदारी स्वीकारली आणि संघासाठी चांगली कामगिरी केली.
त्याच्या या चमकदार कामगिरीनंतर टीम डेव्हिडला ऑस्ट्रेलियन संघातही खेळण्याची संधी मिळेल का, हा प्रश्न आता तीव्र झाला आहे. डेव्हिडचा लवकरच संघात समावेश होऊ शकतो, असे संकेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने दिले आहेत.
फॉक्स क्रिकेटच्या बातमीनुसार, अॅरॉन फिंच म्हणाला, “टिम डेव्हिड खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आयपीएलचे शेवटचे काही सामने त्याच्यासाठी खूप चांगले होते. त्याने झटपट फलंदाजी करत महत्त्वाच्या सामन्यामध्ये संघाला विजय मिळवून दिला. पहिल्या चेंडूपासूनच फटकेबाजी करणे हा प्रत्येकाचा डाव नसतो. पण टीम डेव्हिडकडे ते कौशल्य आहे. तो सातत्यपूर्ण कामगिरी करणार आहे आणि आम्ही निश्चितपणे त्याच्या नावावर लक्ष ठेवू.” तसेच अॅरॉन फिंचने स्वतःच्या सातत्याने होत असलेल्या खराब कामगिरी वरही भाष्य केले आहे. फॉर्ममध्ये परतण्यासाठी त्याच्या तांत्रिक बाबींवर काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी तो हरवलेला फॉर्म परत मिळवेल, अशी आशा त्याने व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या:

