🕒 1 min read
मुंबई : उच्च न्यायालयाने (High Court) बैलगाडी शर्यतीला (Bullock Cart Race) आज परवानगी दिली आहे. बैलगाडी मालक, संघटनांसह आमदार महेश लांडगे यांच्या गेली दहा वर्षे प्रयत्नांमुळे बैलगाडी शर्यंत पुन्हा सुरु झाली, असे मत आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padlakar) यांनी आज व्यक्त केली आहे.
आता राज्यात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे. न्यायालयाच्या निकालामुळे राज्यातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. चार वर्षांपूर्वी न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. मात्र, ही बंदी आता उठवण्यात आली आहे. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे.
राज्यात 2011 पासून शर्यतीवर बंदी होती. सन 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शर्यंती सुरु केल्या होत्या, पण प्राणीमित्र न्यायालयात गेल्यामुळे पुन्हा बंदी आली. आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) शर्यंतीसाठी आग्रही होते, असे गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
राज्यातील शेतक-यांसह बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. न्यायालयात निर्णय झाला तरच राज्यात चांगलं होत आहे, हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील सरकार काहीच करीत नाही हे आज सिद्ध झालं. आम्ही झरे गावात एक मोठी स्पर्धा आयोजित केली. सरकारने त्यावेळी स्पर्धा होऊ नये यासाठी प्रयत्न केले. परंतु स्पर्धेस मिळालेल्या प्रतिसादानंतर सरकारचे डाेळे उघडले. आज शेतक-यांच्या चळवळीला यश आले आहे.
भिररररररर …………
अखेर सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली. हा विजय बैलगाडा चालक-मालक, संघटना व शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांचा…
जल्लोष शेतकऱ्यांचा, बैलगाडा चालक-मालक व संघटनांचा…#बैलगाडा #बैलगाडाशर्यत #शर्यत pic.twitter.com/wMvIHQLuuk
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) December 16, 2021
महत्वाच्या बातम्या
- कार्यकर्ते जमिनीवर, राज ठाकरे खुर्चीवर बसले जेवायला?, मनसेने सांगितलं कारण
- एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची ठाकरे सरकारची तयारी सुरु!
- ‘औरंगाबाद-वेरूळ’ महोत्सवाऐवजी आता होणार अजिंठा महोत्सव; कलाप्रेमींच्या उत्साहाला उधाण!
- ‘तो’ अधिकार राज्यपलांचाच; अजित पवारांनी सांगितला लोकशाहीचा धडा
- ‘बैलगाडा शर्यत आमच्या सरकारमुळेच…’, देवेंद्र फडणवीसांचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
