Share

कार्यकर्ते जमिनीवर, राज ठाकरे खुर्चीवर बसले जेवायला?, मनसेने सांगितलं कारण

Published On: 

🕒 1 min read

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे नाशिक, औरंगाबाद आणि पुणे दौरे सुरु आहेत. यामध्ये नाशिक आणि औरंगाबाद या शहरांमधील दौरा आटपून राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्षाच्या तयारीचा भाग म्हणून हा दौरा असून या दौऱ्यात ठाकरे शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघ निहाय बैठका घेणार आहेत.

पुणे दौऱ्यावर असताना काल राज ठाकरे यांनी एका कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर आज त्यांनी एका बाळाचे नामकरणही केले. त्यांचा आज एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामध्ये राज ठाकरे यांनी पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला. राज ठाकरे हे काही पदाधाकऱ्यांसोबत जेवायला बसले आहेत. मात्र राज ठाकरे हे एकटे खुर्चीवर बसून जेवत आहेत. इतर कार्यकर्ते मात्र जमिनीवर जेवायला बसले आहेत. यावरुन काही लोक त्यांच्यावर टीका करत आहेत.

https://www.facebook.com/MNSVruttantAdhikrut/posts/1976961595839227

राज ठाकरेंच्या या फोटोवर टीका करण्यात आली. मात्र राज ठाकरे खुर्चीत का जेवायला बसले त्याचे कारण मनसेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ‘कमरेवर झालेल्या शस्त्रक्रीयेमुळे नेहमी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सोबत जमीनीवर पंगतीत बसणारे राज ठाकरे यांना यावेळी खुर्चीवर बसून जेवावे लागले, असे स्पष्टीकरण मनसेकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, मनसे नेते अनिल शिदोरे, बाबू वागासकर, सरचिटणीस किशोर शिंदे, मनसे राज्य सचिव सचिन मोरे, उपाध्यक्ष बाळा शेडगे, नगरसेवक, शहराध्यक्ष वसंत मोरे तसेच श्रीनिवास घाटगे हे देखील उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!