औरंगबाादः मराठवाड्याच्या विकासाला मध्यभागी ठेवून तसेच पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने ‘औरंगाबाद – वेरूळ महोत्सव’ सुरू झाला. मात्र गेली पाच वर्षे हा देशी विदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला हा सोहळा बंद पडला आहे. २५ पेक्षा अधिक वर्षे अविरतपणे सुरू असलेला हा महोत्सव बंद होण्यामागे अनेक कारणे आहेत. मात्र गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेरुळ महोत्सव सुरू करण्याच्या हालचाली होऊनही फारसा फायदा झालेला नाही. तरीही तो यंदा पुन्हा सुरू व्हावा अशी मागणी कलाप्रेमी औरंगाबादकर व पर्यटकांमधून होत होती. यंदा जानेवारी महिन्यात भव्य अशा अजिंठा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने सन १९८५ मध्ये वेरूळ महोत्सव सुरू करण्यात आला. सुरुवातीच्या काळात ५०० ते ६०० एेवढी प्रेक्षक संख्या होती. २००१ पर्यंत वेरूळ याठिकाणी महोत्सव होत होता.हिवाळ्यात लेण्यांच्या पायथ्याशी होणारा हा महोत्सव पर्यटक, रसिकांसाठी गैरसोयीचा ठरू लागला. त्यामुळे २००२ मध्ये औरंगाबाद शहराच्या विकासाची मुर्हूतमेढ रोवणाऱ्या मलिक अंबरच्या ‘ सोनेरी महल ‘ याठिकाणी त्याचे स्थलांतर करण्यात आले होते. आता पुन्हा वेरुळ महोत्सव अजिंठा महोत्सव नावाने सुरू होत असल्यामुळे कलाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.
मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, हे वर्ष आपण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर अजिंठा लेणी परिसरात महिला समूहाच्या उत्पादनांचे सरस प्रदर्शनाचे आयोजन करावे. त्यासोबतच पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी लेणी परिसरात यंदा अजिंठा महोत्सव भरवण्यात यावा. या प्रदर्शनासह महोत्सवासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेने निधीसह परिपूर्ण नियोजन करून प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- आज हा आनंदाचा दिवस उजाडलाच; जयंत पाटलांची प्रतिक्रिया
- विराट कोहलीच्या वक्तव्यावर सौरव गांगुलीची धक्कादायक प्रतिक्रिया
- कसोटीतील निवृत्तीच्या वृत्तावर जडेजाचे सूचक ट्विट
- वर्ग-३, वर्ग-४ च्या पदभरती परीक्षा शासनानेच घ्याव्यात- आ. सतिश चव्हाण
- गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजाचा असलेला लढा अखेर यशस्वी झाला- रुपाली चाकणकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

