Share

IPL 2O22 सुरू असताना भारताच्या माजी क्रिकेटरला झाला कोरोना; शास्त्री, रैना चिंतेत!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात आयपीएल २०२२ स्पर्धा सुरू असताना भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राला कोरोनाची लागण झाली आहे. चोप्रा आयपीएलमधील हिंदी कॉमेंट्री पॅनलचा एक भाग आहे आणि आता काही दिवस तो आयपीएलपासूनदूर राहणार असल्याची माहिती आहे.

आकाश चोप्राने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांना आपल्या आरोग्याविषयी अपडेट दिले आहे. चोप्राने ट्वीट केले, की जवळपास दोन वर्षे गोळी चुकवल्यानंतर मीही कोरोना व्हायरसला बळी पडलो आहे. होय. आतापर्यंत लक्षणे सौम्य आहेत. मी लवकरच पुनरागमन करेन.

रवी शास्त्री, सुरेश रैना, हरभजन सिंग, धवल कुलकर्णी आणि निखिल चोप्रा हे देखील हिंदी कॉमेंट्री पॅनेलचा भाग आहेत. हिंदी कॉमेंट्रीमध्ये नावीन्य आणण्यासाठी ओळखला जाणारा आकाश चोप्रा आता आयपीएलच्या काही सामन्यांमध्ये कॉमेंट्री करू शकणार नाही.

भारतात कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. भारतात जवळपास एका महिन्यापासून दररोज १०००० पेक्षा कमी प्रकरणे नोंदवली जात आहेत. १ एप्रिल रोजी देशात एकूण १२६० नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!