🕒 1 min read
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जुलै महिन्यात होणाऱ्या आगामी राष्ट्रपती निवडणुकीची बिगुल वाजवला आहे. या संदर्भात बॅनर्जी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. याचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं असून, ही बैठक १५ जून रोजी पार पडणार आहे. आमच्यातील एखादा प्रतिनिधी या बैठकीला हजर असेल,” असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. मात्र या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित नसतील असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
“या सर्वपक्षीय बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीबाबत चर्चा होईल, त्याप्रमाणे केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग कसा केला जातोय, यावरही चर्चा होणार आहे.” असं राऊत म्हणाले. राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागल्यावर राऊतांनी गद्दारी केलेल्या आमदारांची नावे घेतले आहेत. “आमदारांबद्दल आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या, त्यांच्या अपमान करण्याचा आमचा मानस नाही. कारण आमच्या हातात २ दिवस ईडी दिलं तर फडणवीससुद्धा शिवसेनेला मतदान करतील.” अशी टीका राऊतांनी केली.
दरम्यान, “राज्यसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपने डावललं आहे,” अशी टीका त्यांनी भाजपवर केली. पंकजा मुंडेंबाबत चिंता व्यक्त करण्याचा आम्हाला अधिकार आहे, कारण या महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती टिकवण्यासाठी मुंडे यांचा मोठा हात आहे.” असेही संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- राज्यसभा आणि विधान परिषदा मिळून किती कोटींचा धूर निघाला?; सामना ‘रोखठोक’ मधून संजय राऊतांचा सवाल
- बेजबाबदार विधाने करून नुपूर व्हायचे आहे का?; नीलम गोऱ्हेंचा अमृता फडणवीसांना टोला
- “आमचं नशीब चांगलं म्हणून ते…”, छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य
- देशात लोकप्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते तेच आमदारांमध्ये अप्रिय कसे?; ‘मनसे’चा टोला
- आंद्रे रसेलनं खरेदी केली मर्सिडीज बेंझ एएमजी कार, ‘या’ गाडीची किंमत ऐकून व्हाल थक्क; पाहा VIDEO!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
