टीम महाराष्ट्र देशा : बऱ्याच फलंदाजांनी मोठ-मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. तरी काही फलंदाज मैदानावर अशी कामगिरी करतात की गोलंदाजांना घाम फुटतो. आजचा दिवस (१ मार्च) देखील ऐतिहासिक खेळीचा साक्षीदार आहे. हा दिवस एका अशा खेळाडूशी जोडलेला आहे. ज्याने जवळ-जवळ ६१४ मिनिट गोलंदाजांचा सामना करत बाँड्री व सिंगल डबालच्या मदतीने आपल्या संघाला मजबूत स्थितीत नेवून ठेवलं. त्या फलंदाजाचं नाव आहे गॅरी सोबर्स ज्यांना जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू म्हणून ओळखलं जात.
बारबोडास मध्ये जन्मलेले गॅरी सोबर्स तेव्हा २१ वर्षाचे होते. जेव्हा ते पाकिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सबीना पार्कमध्ये फलंदाजीसाठी उतरले हा सामना २६ फेब्रुवारी १९५८ रोजी सुरु झाला होता. तेव्हा कसोटी सामना हा सहा दिवसांचा असायचा (एक दिवस आराम) त्या सामन्यात पाकिस्तानचा पहिला डाव ३२८ धावांत आटोपला. ज्यामध्ये सलामीवीर इम्तियाज अहमदने १२२ धावा केल्या होत्या. तर विंडीज कडून एरिक एटकिंसनने ५ विकेट्स घेतल्या.
विंडीजच्या डावाची सुरुवात कोनराड हंटे आणि रोहन कनहाई यांनी केली. कोनराड हे संघाची ८७ धावसंख्या असताना बाद झाले. त्यानंतर मैदानावर आले ते गॅरी सोबर्स त्यानंतर या दोघांनी संघाची धावसंख्या ५३३ पर्यंत नेवून ठेवली. त्यावेळी गॅरी सोबर्सने एक विक्रम आपल्या नावावर केला.
गॅरी सोबर्सचा विक्रम आतापर्यंत कोणताही फलंदाज तोडू शकला नाही. त्यांनी सर्वात कमी वयात त्रिशतक ठोकण्याचा विक्रम नोंदवला होता. त्यावेळी त्यांचे वय २१ वर्षे २१३ दिवस होते. याच त्यांच्या नाबाद (३६५) त्रिशतकाच्या जोरावर विंडीजने आपला पहिला डाव ३ विकेट ७९० धावांवर घोषित केला. आणि शेवटी हा सामना विंडीजने एक डाव आणि १७४ धावांनी जिंकला. गेरी सोबर्सने आपल्या कारकिर्दीत एकूण ९३ कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये २६ शतक व ३० अर्धशतकांच्या मदतीने ८०३२ धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या :


