पुणे: शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्कार तसेच जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. १६ फेब्रुवारी रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २४ वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर रघुनाथ कुचिक याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यानंतर त्याला जामीन देण्यात आला आहे. या सर्व प्रकारानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ संतापल्या आहेत.
पुण्यातील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे आरोपीला मदत करत असल्याचा थेट आरोप चित्रा वाघ यांनी केला. १६ फेब्रुवारीला गुन्हा दाखल होऊनही पुणे पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळेच आरोपीला जामीन मिळवण्यासाठी वेळ मिळाला. अशाप्रकारे वेळकाढूपणा करून पोलिसांनी एकप्रकारे आरोपीला मदतच केली, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.
राजकीय गुन्ह्यात मात्र पुणे पोलीस हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केलाय. त्यामुळे जोपर्यंत आरोपीला अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला. दरम्यान पीडित मुलगी सगळीकडे जाऊन आली, मात्र तिला कुणी न्याय दिला नाही, त्यामुळे आता पवार साहेबांनीच यात लक्ष घालावं, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘हे’ आहेत कसोटी पदार्पणात सर्वात जास्त धावा करणारे भारतीय फलंदाज
Russia -Ukraine War: रशियाकडून युक्रेनमधील जगातील सर्वात मोठे विमान उध्वस्त
‘किती तरी मंत्री जेलमध्ये जाण्यासाठी वेटिंगवर’; राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
“लवासाबाबद सत्तेचा दुरुपयोग, मी गप्प बसणार नाही”; किरीट सोमय्या आक्रमक!
Russia -Ukraine War: युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी आता भारतीय वायुदल मैदानात


