Share

Gajanan Kale: “तात्काळ ४०० शासन निर्णय काढणारा” ; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर गजानन काळेंची खोचक टीका

Published On: 

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी काल रात्री आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे सुपूर्द केला. राजीनामा देण्याअगोदर त्यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधला होता. या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि भाजपकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. या सर्व घडामोडीनंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसेचे नेते गजानन काळे (Gajanan Kale ) यांनीही ट्वीट करत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.

“अडीच वर्षात काही केलं नाही मात्र सरकार जातंय असं कळताच गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार यांच्यासाठी तात्काळ ४०० शासन निर्णय काढणारा कर्तबगार मुख्यमंत्री पाहून मन खूप भरून आलंय राव. रडू आवरत नाही आहे, डोळे सुजले माझे कालपासून हे पाय उतार झाले म्हणून,” अशा शब्दांत मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विट केले आहे.

दरम्यान सोशल मिडीयावर अनेक भावून पोस्ट कालपासून पहावयास मिळत आहेत. तरुण पिढीकडून अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत. ज्यात उद्धव ठाकरेंच्या बाजूने असलेला एक गट दिसून येत आहे. राजकारणातील या घडामोडी इतिहासात कायम स्मरणात ठेवल्या जातील. काल या सर्व घडामोडीनंतर भाजपकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. तर भाजपच्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार स्थापन होण्याचा दावाही केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!