Share

Amol Mitkari : “महाराष्ट्रात रामराज्य आले भक्तांनी कालच एकमेकांचे तोंड…”, अमोल मिटकरींचा भाजपवर निशाणा

Published On: 

मुंबई: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि भाजपकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. या सर्व घडामोडीनंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari ) यांनीही ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात आता रामराज्य आले. भक्तांनी कालच एकमेकांचे तोंड गोड केले. इथून पुढे शेतकऱ्यांचे पुर्ण कर्ज माफ होणार, पेट्रोल ५० रू, गॅस २५० रू होणार. महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होणार! बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार. काय ती झाडी काय तो डोंगार? एकदम ओके सरकार “, असा टोला मिटकरी यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान सोशल मिडीयावर अनेक भावून पोस्ट कालपासून पहावयास मिळत आहेत. तरुण पिढीकडून अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत. ज्यात उद्धव ठाकरेंच्या बाजूने असलेला एक गट दिसून येत आहे. राजकारणातील या घडामोडी इतिहासात कायम स्मरणात ठेवल्या जातील. काल या सर्व घडामोडीनंतर भाजपकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. तर भाजपच्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार स्थापन होण्याचा दावाही केला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!