Share

Aastad kale : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामान्यानंतर आस्ताद काळेची प्रतिक्रिया, म्हणाला…

Published On: 

मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (२९ जून) फेसबुक लाईव्ह येत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राजकीय तसेच मनोरंजन क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्येच आता संपूर्ण घटनेवर अभिनेता आस्ताद काळे याने प्रतिक्रिया दिली आहे.

आस्ताद हा सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. तो नेहमी विविध मुद्द्यांवर त्याची वैयक्तिक मत मांडताना दिसतो. नुकतंच आस्ताद काळे याने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत त्याने लिहिले की, “महाराष्ट्राच्या राजकीय कथानकातलं एक उत्कंठावर्धक वळण…..”. सध्या त्याची ही फेसबुकपोस्ट खुप चर्चेत आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या पोस्टवर कमेंट करत एक युजर म्हणाला की, ‘महाराष्ट्रातील ED कार्यालय आता बंद होतील….आता ED वालेही बेरोजगार …’, अशा वेगवेळ्या कमेंट या पोस्टवर येऊ लागल्या आहेत.

दरम्यान, सोशल मिडीयावर अनेक भावून पोस्ट कालपासून पहावयास मिळत आहेत. तरुण पिढीकडून अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत. ज्यात उद्धव ठाकरेंच्या बाजूने असलेला एक गट दिसून येत आहे. राजकारणातील या घडामोडी इतिहासात कायम स्मरणात ठेवल्या जातील. काल या सर्व घडामोडीनंतर भाजपकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. तर भाजपच्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार स्थापन होण्याचा दावाही केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!