🕒 1 min read
मुंबई : आगामी काळात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२२ पूर्वी सर्व संघ आपापल्या तयारीला लागले आहेत. विश्वचषकासाठी सर्व संघ आपली बेंच स्ट्रेंथ मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या टी-२० विश्वचषकापासून आतापर्यंत भारताने ११ वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे. त्यापैकी काहींनी आयपीएल २०२२ मध्ये चमकदार गोलंदाजी करूनही दाखवली आहे. तरीही ते टीम इंडियामध्ये आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरले नाहीत.
भारताचा माजी कर्णधार आणि निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांतने भारताच्या गोलंदाजी लाइनअपबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो भारताच्या काही युवा गोलंदाजांवर खूपच प्रभावित झाला आहे. त्यामुळे त्याचे म्हणणे आहे की त्यांना टी-२० विश्वचषकापूर्वी संघात समाविष्ट करावे. कारण तो अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर खूपच प्रभावित झाला आहे. अर्शदीपने आयपीएल २०२२ मध्ये डेथ ओव्हर्समध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याला शेवटच्या इंग्लंड दौऱ्यावर टी-२० मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. तेव्हापासून त्याने ४ सामन्यात ६ गडी बाद केले आहेत. त्यापैकी डेथ ओव्हरमध्ये त्याने ५ बळी घेतले आहेत. फॅनकोडच्या एका कार्यक्रमात बोलताना श्रीकांतने अर्शदीप सिंगबद्दल एक भविष्यवाणी केली आहे. आगामी काळात तो टी-२० चा सर्वोत्तम गोलंदाज असेल असे त्याने म्हटले आहे.
श्रीकांत म्हणाला की, ‘भविष्यात तो आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये जगातील नंबर वन खेळाडू असेल. त्यामुळे त्याची भारतीय संघाने दखल घ्यावी. तो टी-२० विश्वचषक संघात असावा. टी-२० विश्वचषकात भारताच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहचे स्थान निश्चित झाले आहे. अर्शदीप सिंग व्यतिरिक्त हर्षल पटेल, आवेश खान, दीपक चहर आणि मोहम्मद शमी संघात स्थान मिळवण्याच्या स्पर्धेत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra Cabinet Expansion : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या?, सविस्तर वाचा…
- CWG 2022 : भारतीय महिला क्रिकेट संघाची जबरदस्त कामगिरी, केला सेमीफायनलमध्ये प्रवेश!
- Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | शिवसेना कुणाची? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज ‘सर्वोच्च’ सुनावणी!
- IND vs SA : भारतीय संघ पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेशी भिडणार, ‘असे’ आहे सामन्यांचे वेळापत्रक!
- Chandrakant Khaire | उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात बोलणाऱ्यांना शिवसैनिक सोडणार नाहीत – चंद्रकांत खैरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
