Share

Rajesh Kshirsagar : मातोश्री हे आमचं मंदिर, आमचा देव मंदिरातच योग्य होता; पण त्याला बाहेर काढलं गेलं – राजेश क्षीरसागर

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात काल शिंदे-भाजप सरकारने बहुमत जिंकलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. सपा आणि एमआयएमचे आमदार यावेळी तटस्थ राहिले होते. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजयाची घोषणा केली. भाजपा आणि शिंदे गटाला बहुमत मिळाल्यानंतर अनेक नेत्यांनी सभागृहात अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. काल १६४ मते भाजपच्या सभापती उमेदवाराच्या बाजूने पडली आणि आजही शिंदे यांना तेवढीच मते पडली होती. या मोठ्या विजयानंतर आता बंडखोर आमदारांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत.

दरम्यान कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी आपले मत व्यक्त केले. मातोश्री हेच आमचं मंदिर आहे. आमचा देव (उद्धव ठाकरे) मंदिरातच बरा होता. आणि ते योग्य होते. पण त्याला बाहेर काढलं गेलं. अशा शब्दांत शिवसेनेचे बंडखोर माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत भावना व्यक्त केली आहे.

यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे माझे जुने सहकारी आहेत. मधल्या २०१४ ते १९ दरम्यान काही मतभेद झाले होते, त्यामुळं आज मी मन मोकळं करायला त्यांना भेटलो. एकनाथ शिंदे गट आणि भाजप एकत्र आहेत. शिवसेना आणि भाजप वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू. मातोश्री आमचं मंदिर असून एकनाथ शिंदे हे संकटमोचक आहेत. उद्धव ठाकरे यांना २०१६ ते १७ पासून युवा सेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री म्हणून दाखवलं गेलं. पण, आमचा देव मंदिरात होता, तेच योग्य होतं. त्याला बाहेर काढलं गेलं. पण, दर १० ते १५ वर्षांनी शिवसेनेमध्ये अशी परिस्थिती येते, ती कशामुळे येते, याचा विचार व्हावा. मला खात्री आहे, राज्यातील शिवसैनिक आम्हाला गद्दार म्हणणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मंत्रीपद मिळण्याबाबतही बोलून दाखवले
विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत जेव्हा शिवसेना भाजप युती तुटली, तेव्हा सुभाष देसाई पराभूत झाले होते. त्यानंतरही त्यांना मंत्री करण्यात आलं होतं. मलादेखील कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे. मला जर काही जबाबदारी मिळाली तर नक्कीच चांगलं काम करेन. माझ्यासारख्या अनुभवी नेत्याचा वापर केला, तर नक्की फायदा होईल. पण, तो निर्णय मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा आहे, असा सल्लाही यावेळी क्षीरसागर यांनी शिंदे-भाजप सरकारला दिला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!