मुंबई : महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाजे आणि आणखी दोघांना भ्रष्ट्चाराच्या प्रकरणात मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. अनिल देशमुख यांची सीबीआय कोठडी वाढवून देण्यासाठी सीबीआयने विनंती केली होती. ती विनंती अमान्य करत न्यायालयाने देशमुख वाजे व इतर दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
हा निर्णय सीबीआयला धक्का देणारा असून, अनिल देशमुख यांना काही अंशी दिलासा देणारी आहे असे मानले जात आहे . अनिल देशमुख यांना कथित १०० कोटी वसुली प्रकरणात अटक झाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून देशमुख हे अटकेत आहेत. देशमुख यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न केले जात आहेत.
मनी लॉण्ड्रिंग व खंडणी वसुलीच्या आरोपांच्या प्रकरणात अनिल देशमुख हे गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या रडारवर होते. मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले होते. त्याशिवाय, त्यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचाही आरोप होता. या आरोपानंतर विरोधकांनी सरकारला लक्ष्य केल्यानंतर देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ईडीने त्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली होती. त्यानंतर सीबीआयने देशमुखांचा ताबा घेतला होता.
महत्वाच्या बातम्या :


