मुंबई : आयपीएल २०२२मधील विराट कोहलीच्या खराब कामगिरीवर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ”आयपीएल ही एक अशी स्पर्धा आहे जिथे फक्त खेळाडूची कामगिरी पाहिली जाते. विराट कोहलीनेही चांगली कामगिरी केली नाही तर त्यालाही संघातून वगळले जाईल”, असे विराटने म्हटले.
आयपीएलच्या या मोसमात विराट कोहलीची बॅट आत्तापर्यंत शांत आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ४८ धावांची खेळी केली होती. मात्र, त्यानंतर तो चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध फ्लॉप ठरला. विराटने आरसीबीसाठी एकट्याने अनेक सामने जिंकवले आहेत पण या आयपीएल हंगामात तो मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला.
शोएब अख्तर म्हणाला, “आयपीएल फ्रेंचायझीचे मॉडेल हे कामगिरीवर आधारित आहे. इथे कुणालाही सोडले जात नाही. विराट कोहलीनेही यंदा कामगिरी केली नाही तर त्यालाही सोडले जाणार नाही. मी. मी हे मोठे विधान करत आहे. विराट कोहलीच्या मनात सध्या हजारो गोष्टी सुरू आहेत. कोहली हा खूप चांगला माणूस आहे आणि माझा त्याला सल्ला आहे की त्याने आपले लक्ष केंद्रित करावे. त्याने एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. एक सामान्य खेळाडू म्हणून खेळ आणि विराट कोहली असल्याचे दडपण घेऊ नकोस. मला खात्री आहे की तो पुनरागमन करेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

