नवी मुंबई : मशिदीच्या भोंग्यावरून रामदास आठवले यांनी मनसेला आपल्या काव्यमय शैलीत जोरदार टोला मारला. “राज ठाकरे हे आमचे चांगले मित्र आहेत, पण त्यांनी संविधान विरोधी भूमिका घेऊ नये.” असे आठवले म्हणाले. मशिदीच्या भोंग्यावरच्या मुद्द्यावर रामदास आठवले यांनी एक कोटी केली. आठवले म्हणाले, “मशिदीवर आहेत भोंगे कुणी करू नयेत सोंगे.” या कोटीवर जोरदार हशा पिकला.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला डिवचलं आहे. “राज ठाकरे हे बाळासाहेबांचे पुतणे आहेत, उद्धव ठाकरे हेच खरे बाळासाहेबांचे वारसदार आहेत,” असे म्हणत राज ठाकरेंवर काही दिवसांपूर्वीच टीकेची तोफ डागली होती. आता पुन्हा एकदा आठवले यांनी मनसेवर टीका केली आहे. “मशिदीवर आहेत भोंगे कुणी करू नयेत सोंगे.” अशी भन्नाट कोटी आठवलेंनी केली.
कुणीही संविधानाच्या विरोधात जाऊ नये. भोंग्यांच्या मुद्द्यावरून रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना सुनावले. मशिदीवर परंपरागत भोंगे असल्याने वाद होणारे वक्तव्य करू नयेत. खारघर येथील पदवीदान समारंभात आठवले बोलत होते.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

