मुंबई: जो रूटने शुक्रवारी इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. जो रूटला त्याच्या नेतृत्वाखाली अॅशेस मालिका आणि वेस्ट इंडिजच्या कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. या सततच्या पराभवामुळे त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता भारताचे माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांनी जो रूटच्या कर्णधारपद सोडल्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
रूटच्या (joe root) कर्णधारपद सोडण्याचा निर्णयाला विराटशी (virat kohli) जोडत लालचंद राजपूत (lalchand rajput) म्हणाले, “विराट कोहलीने भारतीय संघासाठी जे केले, तेच रूटने इंग्लंडसाठी केले. भारतात येताना त्याने बदलत्या खेळपट्ट्यांवर शतक झळकावले. त्याने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमध्येही धावा केल्या. कर्णधार म्हणून तो अनेक वर्षे आदर्श राहील. मात्र, प्रत्येक क्रिकेटपटूच्या कारकिर्दीत एक वाईट टप्पा येतो आणि रूटच्या बाबतीतही असेच होते. जेव्हा संघ जिंकत नाही, तेव्हा सर्व जबाबदारी कर्णधारावर येते.”
जो रूट सध्या इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी धावा करणारा दुसरा खेळाडू आहे . संघाचा कर्णधार म्हणून त्याने १४ शतके ठोकली आहेत. तर सर्वाधिक कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत अॅलिस्टर कुक अव्वल स्थानावर आहे. जो रूटने ६४ सामन्यांमध्ये इंग्लंड कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये २७ सामने जिंकले असून २६ सामने हरले आहेत. ज्यामध्ये ११ सामने अनिर्णित राहिले आहेत.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 : कमाल धमाल राहुल..! मुंबई इंडियन्सविरुद्ध लखनऊच्या कॅप्टननं ठोकली ‘डबल’ सेंच्युरी
- IPL 2022 MI vs LSG : मुंबईच्या गोलंदाजांची पिसं काढत राहुलनं ठोकलं ‘विक्रमी’ शतक; लखनऊचं रोहितसेनेला २०० धावांचं आव्हान!
- “एकटे नाना लढले तर फेस आला, मी लढलो असतो तर…”; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
- IPL 2022: दीपक चहरच्या एक्झिटने ‘चिन्ना थाला’ चेन्नईमध्ये परतणार?
- IPL 2022 : “इशान किशन १५ कोटींच्या लायक नव्हता…”, CSKच्या माजी खेळाडूची मुंबई इंडियन्सवर टीका!


