Share

Anil Bonde | “हिंदू मुलीला डांबून तिच्या इच्छेविरूद्ध लग्न लावल्याचा…”; अनिल बोंडेंचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील एका मुस्लीम तरुणाने उच्चशिक्षित हिंदू मुलीशी बळजबरीने विवाह केल्याचा धक्कादायक आरोप भाजपा नेते व राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. हिंदू मुलीची संमती नसताना तिच्या मनाविरुद्ध हा विवाह लावला असून ती सध्या अमरावती जिल्हा व सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे, अशी माहिती खासदार बोंडे यांनी दिली. हा लव्ह जिहादचा प्रकार असून लव्ह जिहादच्या विरोधात आपण मोहिम उघडणार असून बजरंग दल, विश्वहिंदू परिषद, दुर्गा वाहिनी कॉलेजमध्ये जाऊन मुलींना जागृत करण्याचं काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.. ते राजधानी दिल्ली येथे माध्यमांशी बोलत होते.

संबंधित मुलीचा ज्याठिकाणी विवाह झाला ती संस्था व वकील बोगस असल्याचा आरोपही बोंडे यांनी केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुस्लीम समुदायला गंभीर इशारा दिला आहे. आपली पोरं सांभाळा, ते जबरदस्तीने हिंदू मुलीशी लग्न करत आहेत. याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असं बोंडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!