Share

Amol Mitkari | काही लोकांनी धर्माच्या नावावर पक्ष काढला – अमोल मिटकरी

Published On: 

🕒 1 min read

अकोला : गणपती स्थापनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरही नाव न घेता टीका केली आहे. यंदा पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसांचे बाप्पा विराजमान झाले आहेत. त्यावर बोलताना मिटकरी म्हणाले की, काही लोक आजही दीड दिवसाचा गणपती बसवतात. मात्र, मी पूर्ण दहा दिवसाचा गणपती बसवतो’. काही लोकांनी धर्माच्या नावावर पक्ष काढला आहे, असे मिटकरी म्हणाले.

अमोल मिटकरी हा सर्वसामान्य वारकरी कुटुंबात जन्मला आहे. माझ्या घरी गेल्या तीन पिढ्यांपासून गणेशोत्सव सुरू आहे. काही लोक माझ्यावर आजही टीका करतात, मला धर्मविरोधी म्हणतात. मात्र, त्यांच्याकडे आजही दीड दिवसाचा गणपती बसतो. मात्र, मी पूर्ण दहा दिवसाचा गणपती बसवतो. असे प्रत्युत्तर त्यांनी टीकाकारांना दिले आहे. पुढे ते म्हणाले, काही लोकांनी धर्माच्या नावावर पक्ष काढला आहे, अशा लोकांना माझ्यावर बोलायचा अधिकार नाही. मी आस्तिक आहे की नास्तिक हे ठरवण्याचा अधिकावर फक्त मला आहे. राज्य घटनेने मला ते अधिकार दिले आहे असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!