Share

दहशतवाद्यांना अंगावर घेणारे बाळासाहेब ठाकरे एकच मर्द होते- उद्धव ठाकरे

Published On: 

मुंबई: एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिल्यानंतर भाजपने शिवसेनेला हिंदुत्वावरून चांगलेच निशाण्यावर धरले आहे. मात्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (२० मार्च) भाजपच्या सर्व आरोपांना थारा दिला. देशाला सात वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाल्याचे तारे कोणीतरी तोडले होते. पण या गेल्या सात वर्षात काय झालं ते सांगा? असा सवाल करत उद्धव ठाकरे यान थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

खरं असेल तर चित्रपटाच्या माध्यमातून जी फाईल उघडली आहे तो काळ आठवा. ज्यावेळी काश्मीरमध्ये हिंदू आणि त्याआधी देशाच्या बाजूने असणाऱ्या मुस्लिमांवर अत्याचार झाला. त्यावेळी सरकार भाजपाने समर्थन दिलेल्या व्ही पी सिंग यांचे होते.  त्यांना आपण विरोध केला होता. कारण त्यांनी पंतप्रधान झाल्यावर कोणत्याही मंदिरात नाही तर दिल्लीतील जामा मशिदीत जाऊन शाही इमामला भेटून आले होते. त्यावेळी भाजपने एकही अवाक्षर काढलं नव्हतं. तेव्हा एकच आवाज होता तो बाळासाहेब ठाकरेंचा होता. पण आता अश्रू ढाळत असलेल्या एकानेही ब्र काढला नव्हता आणि हिंमतही नव्हती. असे म्हणत त्यांनी कश्मीर फाईल्स या चित्रपटावरून भाजपच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले आहे.

तसेच सत्य मांडायचं असेल तर सर्वांसमोर येऊ द्या. पण पिढी बदलल्यानंतर आज आम्ही नवीन इतिहास घडवला म्हणून दंड थोपटत आहेत त्यांची नावंही काश्मिरी जनतेला माहिती नव्हती. अमरनाथ यात्रा रोखली तर हजसाठी एकही विमान उडू देणार नाही असं कोणीही बोललं नव्हतं. दहशतवाद्यांना अंगावर घेणारे बाळासाहेब ठाकरे एकच मर्द होते, दुसरं कोणीही नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!