Share

IPL 2022 : “माझ्याशी लग्न करशील?”, मॅचपूर्वी ‘तिनं’ श्रेयस अय्यरला घातली लग्नाची मागणी! पाहा PHOTO

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये खेळणारे अनेक क्रिकेटपटू आपल्या कामगिरीच्या जोरावर प्रसिद्ध होतात. कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचा कप्तान श्रेयस अय्यर सुद्धा (shreyas iyer) क्रिकेटविश्वात प्रसिद्ध आहे. भारताचा आगामी कर्णधार म्हणून श्रेयसचे नाव घेतले जाते. युवा खेळाडू श्रेयस अय्यरची मुलींमध्ये जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. अशातच त्याला लग्नाचे प्रस्तावही आले आहेत.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी एका महिला चाहतीने श्रेयसला लग्नाचा प्रस्तावही दिला होता. तिने एक पोस्टर घेत श्रेयसला लग्नाची मागणी घातली. या चाहतीचा फोटो कोलकाता संघानेही शेअर केला आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमच्या बाहेर एक पोस्टर घेऊन ही चाहती दिसली, ज्यावर लिहिले होते, ”माझ्या आईने मला मुलगा शोधण्यास सांगितले आहे. तर श्रेयस अय्यर तू माझ्याशी लग्न करशील का?” हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे.

आयपीएलच्या ३०व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा राजस्थान रॉयल्सकडून पराभव झाला. राजस्थानने केकेआरला २१८ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ केवळ २१० धावा करू शकला. श्रेयसने सामना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. त्याने ५१ चेंडूत ८५ धावा केल्या, पण त्याची खेळीही विजयासाठी पुरेशी ठरली नाही.

चहलची हॅट्ट्रिक

१७व्या षटकात युझवेंद्र चहलने संपूर्ण सामना पालटला. चहलने या षटकात कोलकाताच्या ४ फलंदाजांना बाद करत राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला. पहिल्या चेंडूवर त्याने व्यंकटेश अय्यरला बाद केले. चौथ्या चेंडूवर त्याने श्रेयस अय्यरला पायचीत पकडले, पाचव्या चेंडूवर त्याने शिवम मावीला रियान परागकरवी झेलबाद केले आणि षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पॅट कमिन्सला यष्टीपाठी झेलबाद करत हॅट्ट्रिक साजरी केली.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!