मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये कोरोनाचा प्रभाव दिसू लागला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये (DC) कोरोना (covid 19) संसर्गाची ५ प्रकरणे समोर आल्यानंतर बुधवारी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (DC vs PBKS) यांच्यातील सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. आता हा सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमऐवजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली. आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाची आणखी नवीन प्रकरणे समोर येत नसल्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.
ESPNcricinfoच्या वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्स संघात कोरोनाच्या प्रवेशानमुळे आयपीएलने आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी, सोमवारी दिल्ली कॅपिटल्सने संघाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शला सपोर्ट स्टाफ सदस्यांव्यतिरिक्त कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली. त्यामुळे संघाने कुठेही प्रवास करू नये, असा निर्णय गव्हर्निंग काऊन्सिलने घेतला. या कारणास्तव, दिल्ली कॅपिटल्सचा संघ अद्याप पुण्यात पोहोचलेला नाही आणि सर्व खेळाडूंना मुंबईतच क्वारंटाइन करण्यात आले आहे. अशा स्थितीत पंजाब किंग्जला मुंबईत बोलावण्यात येणार आहे.
NEWS ????: CCI – Brabourne to host Delhi Capitals vs. Punjab Kings on April 20th.
Details – https://t.co/8zPLVsS7qJ #TATAIPL pic.twitter.com/yGqEaHfycT
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2022
आज मंगळवारी सकाळी दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंची कोरोना चाचणी झाली. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. हा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच खेळाडू पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात उतरू शकतील. दिल्लीच्या संघाला मुंबईतच सराव करण्यास सांगण्यात आले आहे. मिचेल मार्शची कोविड-१९ आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली आहे. मार्श सुरुवातीला रॅपिड अँटिजेन चाचणीत पॉझिटिव्ह आढळला होता, त्यामुळे दिल्ली आणि पंजाब यांच्यात बुधवारी होणाऱ्या सामन्याबाबत संभ्रम निर्माण झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

