मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आत राज ठाकरे यांच्या आगामी रणनीतीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. राज ठाकरे यांनी नुकतीच पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत एक महत्वपूर्ण बैठक घेतली आहे. मुंबईत पार पडलेल्या या बैठकीत तीन महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसिद्दीमाध्यमांना दिली. १ मे, ३ मे, आणि ५ जून या तीन तारखांना मनसेच्या दृष्टीने महत्वपूर्ण आयोजन करण्यात आले असून, त्या संदर्भात नियोजन करण्याबाबतची चर्चा आज शिवतीर्थावरील बैठकीत झाल्याचे त्यांनी सांगितलं. यावेळी मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे येथील मनसेचे नेते अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आदी नेते उपस्थित होते.
तीन महत्वपूर्ण तारखांना मनसेचा प्लॅन :
१ मे : पुण्यात राज ठाकरेंनी घोषणा केल्याप्रमाणे, महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे रोजी राज ठाकरेंची सभा औरंगाबाद येथे होणार आहे. या करीता औरंगाबाद मनसेसह राज्यातील मनसे पदाधिकारी कामाला लागले आहेत.
३ मे : अक्षयतृतीय ३ मे रोजी आहे. हा दिवस मनसेसाठी महत्वाचा आहे. मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मशिदीवरील भोंगे हटवले गेले नाही तर त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीस लावा, असा आदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला होता. या संदर्भातील भूमिका स्पष्ट केली जाईल.
५ जून : येत्या पाच जूनला राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा आहे. हा दौरा पक्षासाठी महत्वपूर्ण मानला जातो. यामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळेल अशी आशा मनसेला आहे. याकरिता नियोजन करण्याचे आजच्या बैठकीत निर्देश दिले आहेत. अयोध्येत जाऊन मनसे पदाधिकाऱ्यांनी रेकी करून आले असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

