Share

Masoon Sawal poster conflict | पोस्टरमध्ये सॅनिटरी पॅडवर भगवान कृष्णाचा फोटो असल्याने चित्रपट निर्मात्यांविरोधात तक्रार

Published On: 

🕒 1 min read

महाराष्ट्र देशा डेस्क : ‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरचा वाद अनेक दिवस सुरु होता. त्यानंतर आता पुन्हा एका चित्रपटाच्या पोस्टरवरून वाद सुरु झाला आहे. ‘मासूम सवाल’ या चित्रपटाच्या पोस्टरने खळबळ उडाली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शकावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच निर्मात्यांविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. 17 जुलै रोजी ‘मासूम सवाल’ या फ्रिंज चित्रपटाच्या निर्मात्यांनी पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये सॅनिटरी पॅड दाखवण्यात आले आहे. ज्यावर भगवान श्रीकृष्ण यांचे चित्र आहे. त्यावरून हा वाद सुरु झाला आहे.

या पोस्टरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. दिग्दर्शक संतोष उपाध्याय आणि त्यांच्या टीमविरोधात हिंदू राष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित राठोड यांनी तक्रार दाखल केली आहे. उत्तर प्रदेशच्या साहिबाबाद सर्कल येथील पोलीस ठाण्यात आयपीसी कलम २९५ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. साहिबाबाद आणि गाझियाबादमध्ये चित्रपटगृहांच्या बाहेर निदर्शनेही करण्यात आली.

दिग्दर्शकांचे स्पष्टीकरण
चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष उपाध्याय या वादावर म्हणाले की, कधीकधी गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन चुकीचा असतो, ज्यामुळे चुकीची धारणा निर्माण होते. संपूर्ण चित्रपट मासिक पाळीवर आधारित आहे, त्यामुळे पॅड दाखवणे अनिवार्य आहे. म्हणूनच पोस्टरवर पॅड आहे, पॅडवर भगवान कृष्ण नाही.

संतोष उपाध्याय दिग्दर्शित ‘मासूम सवाल’ 5 ऑगस्टला रिलीज झाला आहे. या चित्रपटात मासिक पाळी, त्याच्याशी संबंधित प्रथा आणि अंधश्रद्धा यावर भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटात नितांशी गोयल, एकावली खन्ना, शिशिर शर्मा, मधु सचदेवा, रोहित तिवारी, वृंदा त्रिवेदी, रामजी बाली, शशी वर्मा आणि इतर कलाकार आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!