🕒 1 min read
Abdul Sattar | मुंबई : टीईटी घोटाळा म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या घोटाळ्यामध्ये दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. हि यादी परीक्षा परिषदेकडून जारी करण्यात आली असून यामध्ये तब्बल 7 हजार 874 विद्यार्थ्यांच्या नावाचा समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रकरणात आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे आले आहेत. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी त्यांच्या मुलींची नावं आहेत. या दोन्ही मुली टीईटी घोटाळ्यामध्ये दोषी आढळल्या आहेत.
तसेच या यादीत नावं असलेल्या सगळ्यांवर टीईटीची परीक्षा देण्यासाठी कायमची बंदी घालण्यात आली आहे. परंतु यावर अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया देत हे त्यांच्या मुली दोषी नसल्याचं म्हंटल आहे. मात्र आता राजकीय वर्तुळातून सत्तारांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहेत. “माझ्या मुलींनी परीक्षा दिली होती मात्र त्या पात्रच झाल्या नाहीत मग त्यांची नावं या यादीच आलीच कशी? त्यामुळे जर माझ्या मुली त्यात दोषी आढळल्या तर कारवाई करावी, पण जर त्यांची यात काही चूक नसेल तर मात्र ज्यांनी हा बदनामीचा कट रचला आहे त्यांना फासावर लटकवलं पाहिजे”, अशा शब्दात अब्दुल सत्तार यांनी संताप व्यक्त केला.
अब्दुल सत्तार यांनी बंड करून ते मंत्रिपद सोडून शिंदे गटात आले. त्यामुळे सत्तार यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा होती. पण उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार असतानाच टीईटी घोटाळ्यावरून सत्तार घेरले गेले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारातून सत्तार यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पंगतीला बसले अन् बुंदीच संपली अशी अवस्था सत्तार यांची होणार असल्याचं सांगितलं जात आहे.अखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळी 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Ambadas Danve | TET घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांचा सहभाग होता का? – अंबादास दानवे
- BJP | भाजपचे ‘मिशन बारामती’! सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघात लावणार फिल्डिंग , ‘या’ नेत्याकडे जबाबदारी
- Anil Desai | निवडणूक आयोगाला अभिप्रेत सर्व माहिती आम्ही देऊ – अनिल देसाई
- Chandrakant Khaire | TET प्रकरणात आमदार अब्दुल सत्तारांची चौकशी करा – चंद्रकांत खैरे
- Assembly Monsoon session | अखेर पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला!, 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान अधिवेशन पार पडणार


