Share

Sushmita Sen and Lalit Modi | सुष्मिता आणि ललित पुन्हा गेले व्हेकेशनला?; व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या तुफान कॉमेंट्स

Published On: 

🕒 1 min read

महाराष्ट्र देशा डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही ललित मोदींसह रिलेशनमध्ये असल्याची बातमी आल्यापासून ते दोघेही चर्चेत आहेत. यातच नुकतेच सुष्मिताने तिच्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यावर तिचा कथित बॉयफ्रेंड ललित मोदी यांनी कमेंट केली आहे. ज्यावरून ते दोघेही एकत्र सुट्टीवर गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सुष्मिता सेनने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती जहाजातून पाण्याकडे जाताना दिसत आहे. जहाजातून हळूच खाली उतरून ती पाण्यात पोहायला लागते. या व्हिडिओवर कमेंट करताना ललित मोदींनी लिहिले की, “सार्डिनियामध्ये हॉट दिसत आहेस” त्याच्या या कमेंटवर यूजर्सच्या कमेंट्सचा पाऊस पडला. एका यूजरने लिहिले की, सार्डिनियामध्ये ती तुमच्यासोबत होती हे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहात का?

https://www.instagram.com/p/Cg4Q0CLjccO/

ललित मोदींने काही दिवसांपूर्वीच सार्डिनियाच्या व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले होते. त्याच ठिकाणचे फोटो सुष्मितानेही शेयर केले. त्यात आता सुष्मिताच्या पोस्टवर त्यांनी केलेली कमेंट चाहत्यांना विचार करायला भाग पाडत आहे की दोघेही एकत्र सुट्टीवर गेले होते. ललित मोदीसोबतच्या नात्याबाबत सुष्मिताने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या रिलेशनशिपच्या चर्चांना तिने नकारही दिलेला नाही.

ललितने केला होता खुलासा
14 जुलै रोजी ललित मोदींने सोशल मीडियावर ही माहिती दिली होती की, ते आणि सुष्मिता सेन एकमेकांना डेट करत आहेत. या वृत्तानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. लोक सुष्मिता सेन आणि ललित मोदींला ट्रोल करू लागले. त्यानंतर दोघांनीही आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. ललित मोदींने सांगितले की, आमचे लग्न अद्याप झाले नाही पण लवकरच आम्ही सेटल होऊ. तर दुसरीकडे, सुष्मिता सेनने मुलींसोबतचा फोटो शेअर करताना सांगितले की, ती तिच्या आयुष्यात आनंदी आहे आणि पण लग्न केले नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!