Share

Ambadas Danve | TET घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांचा सहभाग होता का? – अंबादास दानवे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावं टीईटी घोटाळ्यात आल्यानंतर सर्वच विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर टीका केली जातेय. औरंगाबादचे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनीही टीका केलीय. ते म्हणाले, ‘जवळपास 8 हजार उमेदवारांचा घोटाळा बाहेर आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच औरंगाबादचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींचीही नावं या घोटाळ्यात आली आहेत.

या प्रकराची सखोल चौकशी झाली पाहिजे. अब्दुल सत्तारांचाही टीईटी घोटाळ्यात कुठे संबंध आहे का याचीही चौकशी झाली पाहिजे. ज्यांचं या घोटाळ्यात नाव आलंय, ते महाराष्ट्राचे आधी महसूल मंत्री होते, ग्रामविकास मंत्री होते आणि आता यांना कॅबिनेटमंत्री व्हायचंय. त्यामुळे शिक्षण खातं मिळालं तर आणखी चांगली चौकशी होईल, असं वक्तव्य केलं जातंय. मात्र यावर तपास झालाच पाहिजे, अशी मागणी शिवसेना करेल, असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Politics Video

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या