🕒 1 min read
जालना : नवे राज्यासरकार स्थापन झाल्यानंतर जवळजवळ ४० दिवसानंतर मंत्रिमडळाचा विस्तार करण्यात आला. काल १४ ऑगस्टला मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. अब्दुल सत्तार यांच्याकडे राज्याच्या कृषीमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. गेल्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. शेतकरी आत्महत्या ही सर्वात दुर्दैवी बाब असल्याचं मत कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांच्यासोबत अर्जून खोतकरही उपस्थित होते.
परभणीमध्ये कृषी विद्यापीठाचे एक युनिट आहे. या व्यतरीक्त औरंगाबाद आणि जालनामध्ये असेच एक युनिट उभारण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. यासाठी एक कमिटी नेमून याबाबत अहवाल घेण्यात येईल. मराठवाडा आणि विदर्भात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी आत्महत्या करतोय ही बाबच सर्वात दुर्देवी असल्याचे सत्तारांनी म्हणले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Santosh Bangar । पहा संतोष बांगर यांची ‘दबंग’ स्टाईल; हॉटेल मॅनेजरच्या कानशिलात लगावल्या
- Chhagan Bhujbal । मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे ‘जय महाराष्ट्र’ म्हणायचे की ‘वंदे मातरम’?; छगन भुजबळांचा टोला
- Ashish Shelar | मुंबई महापालिकेतील पितापुत्रांची सत्ता उलथवून टाकणार; आशिष शेलारांचा इशारा
- Viral Photos of Dominos | पिझ्झा बेसवर टांगलाय फरशी घासण्याचा ब्रश; डॉमिनोजवर संतापले लोक
- Independence Day | राजकारणातील हेवेदावे, टिका ही तत्वाशी असते व्यक्तीशी नाही – उदय सामंत


