🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क : सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पिझ्झा बेसचा फोटो पाहून तुम्हाला कधीही पिझ्झा खाण्याची इच्छाच होणार नाही. हे प्रकरण आहे बंगळुरूमधले. बंगळुरूमधील डॉमिनोज स्टोअरमधले काही फोटो समोर आले आहे, जे पाहून लोक डॉमिनोजच्या स्वच्छतेवर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये डॉमिनोजच्या पिझ्झा बेस ठेवलेल्या ट्रेवर टॉयलेटचा ब्रश आणि फरशी पुसण्याचा मॉप लटकलेला दिसत आहे. या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार कॉमेंट्स करत डॉमिनोजवर कारवाईची मागणी केली आहे.
साहिल नावाच्या एका व्यक्तीने डॉमिनोजच्या आउटलेटमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पिझ्झा बेसच्या ट्रेवर लटकलेला मॉप आणि टॉयलेट ब्रश पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की असा निष्काळजीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. इथून पुढे कधीही डॉमिनोजमध्ये पिझ्झा खायला जाणार नाही, असे म्हणत लोकांनी डॉमिनोजवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान सोशल मीडियावर हे फोटो शेअर करणाऱ्या साहिलने एका मीडिया वेबसाइटला सांगितले की, स्टोअरमध्ये पिझ्झा ऑर्डर करून तो 10 मिनिटांसाठी बाहेर गेला होता. परत आल्यावर समोरच्या दरवाजाला कुलूप असल्याने तो स्टोअरच्या मागच्या दारात उभा राहिला. यादरम्यान त्याने पिझ्झाच्या बेसवर मॉप लटकत असल्याचे पाहिले आणि तात्काळ त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ काढले.
This is how @dominos_india serves us fresh Pizza! Very disgusted.
Location: Bangalore @fssaiindia @MoHFW_INDIA @mla_sudhakar @mansukhmandviya #foodsafety pic.twitter.com/1geVVy8mP5
— Sahil (@sahilkarnany) July 24, 2022
डॉमिनोजचे स्पष्टीकरण
या प्रकरणावर डॉमिनोजच्या वतीने सांगण्यात आले की, आम्ही स्वच्छता आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतो. आम्हाला एका आउटलेटमध्ये असलेल्या अस्वच्छतेची बातमी कळाली आहे. आम्ही या संबंधित रेस्टॉरंटवरही कारवाई केली आहे. आम्ही स्वच्छता आणि सुरक्षिततेला गांभीर्याने घेतो.
महत्वाच्या बातम्या:
- Independence Day | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात जयंत पाटलांकडून लालपरीचे सारथ्य
- Independence Day | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राज्यातील जनतेला उद्देशून भाषण, जाणून घ्या महत्वाचे मुद्दे
- Nana Patole | “हे दुरंगे तिरंग्याला संपवायला निघालेत”; नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल
- Independence Day | मोहन भागवतांच्या हस्ते नागपुरातील RSS मुख्यालयात ध्वजारोहण
- Independence Day | OBC, मराठा यांना आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध – एकनाथ शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
