Share

Ashish Shelar | मुंबई महापालिकेतील पितापुत्रांची सत्ता उलथवून टाकणार; आशिष शेलारांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

Ashish Shelar। मुंबई : पक्षश्रेष्ठींचा विश्वास आणि लढवय्या असल्याने मुंबई भाजप अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा आमदार अॅड. आशिष शेलार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत अवघ्या दोन जागांसाठी सत्तेचा घास भाजपकडून हिरावला गेला. त्याचा वचपा काढून शिवसेनेकडून सत्ता हिसकावण्याचा भाजप पक्षश्रेष्ठींचा निर्धार आहे. मुंबईत महापौर भाजपचाच होणार, अशी घोषणा करत शेलार यांनी केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा आशिष शेलार आक्रमक झाले आहेत.

आशिष शेलार म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दोन अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. एक म्हणजे देशातील भ्रष्टाचार समूळ नष्ट करणे आणि दुसरं म्हणजे घराणेशाही उखडून फेकणे. पंतप्रधान मोदी मुंबईकरांच्या मनातलच बोलले आहेत. येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची बजबजपुरी उखडून फेकली पाहिजे. महापालिकेत गेल्या 25 वर्षापासून एकाच कुटुंबाची सत्ता आहे. मी नाही तर माझा पुत्र अशा पद्धतीने पालिकेचा कारभार सुरू आहे. त्यामुळे पालिकेतील पितापुत्रांची सत्ता उलथवून टाकण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मुंबई महापालिका निवडणूक आम्ही सर्व मिळून लढू आणि जिंकू असा विश्वास शेलार यांनी यावेळी व्यक्त केला. भ्रष्टाचार उखडून फेकणे आणि घराणेशाही संपुष्टात आणून लोकशाही मजबूत करण्यावर आमचा भर असेल. मुंबईकरांना विजयी करण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!