🕒 1 min read
हिंगोली : नेते मंडळींनी आपली कामे न करणाऱ्या लोकांना ओरडल्याचे तुम्ही खूप वेळा बघितलं असेल पण आज एका नेत्याने चक्क रागात हॉटेल व्यवस्थापकाच्या कानशिलात एकदाच नाही तर खूप वेळा मारल्याचा प्रकार समोर आला आहे. आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध असलेले आमदार संतोष बांगर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते एका हॉटेल मॅनेजरला शिवीगाळ करत मारताना दिसत आहेत. कामगारांना मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या एका हॉटेलची पाहणी करत असताना अन्नाचा निकृष्ट दर्जा पाहून बांगर चांगलेच संतापले आणि त्यांनी उपहागृह व्यवस्थापकाच्या कानशिलातच लगावल्या.
काय आहे प्रकरण
मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत हिंगोलीतील कामगारांना भोजन पुरवण्याची जबाबदारी ही खासगी कंत्राटदाराला देण्यात आले आहे. मात्र, कंत्राटदारांकडून देण्यात येणारे अन्न हे अगदीच खाण्यायोग्य नाही. त्यातच मार्गदर्शक तत्वांमध्ये शासनाने ठरवून दिलेले अन्न पदार्थ दिले जात नाहीत. यामुळेच संतोष बांगर संतापले होते. त्यांनी आज या उपहारगृहाला भेट दिली व हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी उपहारगृहातीळ सर्व गोष्टींची स्वतः पाहणी केली. त्यात स्वच्छतेची कमतरता होती. एवढेच नाही तर मध्यान्ह भोजनात आळ्या आणि माशा पडलेल्या असल्याचंही पाहायला मिळालं. त्यामुळे बांगर यांनी उपहारगृहाच्या मॅनेजरला जाब विचारत शिवीगाळ केली. तसेच त्याच्या कानशिलातही लगावल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून तो तुफान व्हायरल होतोय.
— Govind Hatwar (@GovindHatwar) August 15, 2022
कारवाईची मागणी
संतोष बांगर यांनी या उपहारगृहाच्या किचनची पाहणी केली असता बराच भाजीपाला हा सडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचपासून पुढे अन्न तयार करून ते लोकांना पोहचवले जात आहे. तसेच शासनाने सांगितलेल्या पदार्थांपैकी कोणताच पदार्थ दिला जात नाही. रोज एकसारखेच अन्न दिले जात आहे. त्यामुळेच संबंधित कंत्राटदाराची चौकशी करुन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी बांगर यांनी जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Chhagan Bhujbal । मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे ‘जय महाराष्ट्र’ म्हणायचे की ‘वंदे मातरम’?; छगन भुजबळांचा टोला
- Ashish Shelar | मुंबई महापालिकेतील पितापुत्रांची सत्ता उलथवून टाकणार; आशिष शेलारांचा इशारा
- Viral Photos of Dominos | पिझ्झा बेसवर टांगलाय फरशी घासण्याचा ब्रश; डॉमिनोजवर संतापले लोक
- Independence Day | राजकारणातील हेवेदावे, टिका ही तत्वाशी असते व्यक्तीशी नाही – उदय सामंत
- Ambadas Danve । गुलाबराव पाटीलच उंदराची चिंधी; अंबादास दानवे यांचा जोरदार हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
