Share

‘गोवा काय आहे हे लवकरच फडणवीसांना कळेल’ – संजय राऊत

Published On: 

मुंबई : आज मीडियाशी बोलताना संजय राऊत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. म्हणाले, शिवसेना मोठा पक्ष आहे आणि शिवसेनेचे आव्हान आहे. ज्याचे आव्हान आहे त्याच्या विरोधात बोंबा मारल्या जातात. भारतीय जनता पक्षाच्या दंडात ताकद आहे असे त्यांना वाटते, पण तसे अजिबात नाही. कारण ते समोरुन वार करत नाहीत, ते मागून वार करतात.

पण काही हरकत नाही, राजकारणात असे पाठीमागचे हल्ल देखील पचवायचे असतात. जे आम्ही पचवतो, अडीच वर्ष झाली या सरकारला आणि अजून अडीच वर्षे जातील. त्यानंतर पुन्हा आम्ही निवडून येणार. असा संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे.

तसेच संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस गोवा जिंकून आले आहेत. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढले आहे, गोवा काय आहे ते त्यांना लवकरच कळेल. कारण गोवा पोर्तुगीज यांना देखील कळला नव्हता. इंग्रजांना देखील कळला नव्हता. त्यानंतर अनेक राजकीय पक्षांना देखील अनेक वर्ष गोवा कळला नाही. त्यामुळे लवकरच माझे मित्र देवेंद्र फडणवीस यांना देखील गोवा काय आहे ते कळेल. गोवा जिंकल्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास वाढला असेल, पण त्यांनी प्रयत्न करावे, त्यांनी राजकीय कार्यात स्वतःला वाहून घ्यावे”. अशी सडेतोड टीका संजय राऊत यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!