Share

“भाजपला कोणीही घाबरत नाही”, संजय राऊतांचे टीकास्त्र

Published On: 

मुंबई : काल (१७ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यात भाजपला पुन्हा येऊ देणार नाही, असे वक्तव्य केले होते. दरम्यान, शरद पवारांच्या या वक्तव्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच भाजपला कोणीही घाबरत नाही, असेही राऊत म्हणाले आहेत.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘भाजपला कोणीही घाबरत नाही. जर भाजप केंद्रीय तपास यंत्रणा, खोटे आरोप, चिखलफेक करुन महाविकास आघाडीचे आमदार, खासदार, नेते यांचे मनोबल खाली आणण्याचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचे आहे.’ तसेच शरद पवार यांनी जो विश्वास दिला आहे की, घाबरु नका मी भाजपा पुन्हा महाराष्ट्रात येऊ देणार नाही ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर महाविकास आघाडीच्या वतीनेही त्यांनी भूमिका मांडली आहे, असेही राऊत म्हणाले.

दरम्यान, पवार आणि महाविकास आघाडीच्या आमदारांची सिल्वर ओकवर बैठक झाली. ही बैठक जवळपास दोन तास चालली. बैठक संपून आमदार निघण्याच्या तयारीत असताना शरद पवार उभे राहिले. ‘त्यांनी आपले दोन्ही हात वर करीत आणि वज्रमूठ तयार करून, घाबरायचे काही कारण नाही. मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देत नाही,’ असा आत्मविश्वास व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!