🕒 1 min read
मुंबई : काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (sonia Gandhi) यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरही काँग्रेस नेत्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान काँग्रेस नेते तथा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांची कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे समजले. त्या आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आणि धैर्याचे प्रतीक आहे. त्यांना लवकर बरे होण्यासाठी माझ्या प्रार्थना आणि शुभेच्छा.”, असे ट्वीट बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. बुधवारी संध्याकाळी सोनिया गांधी यांना ताप आला होता. तापाची हलकी लक्षण समोर आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली गेली.
Concerned about @INCIndia president Hon. Soniaji Gandhi's health after hearing that she has tested positive for Covid19. She is an epitome of inspiration and courage for us all. My prayers and best wishes for her full and speedy recovery.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) June 2, 2022
दरम्यान कालच अंमलबजावणी संचलनालाय म्हणजेच ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यानंतर काँग्रेसकडून तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- आकाश चोप्राच्या ‘टाटा बाय-बाय’ विधानावर पोलार्डनं दिलं प्रत्युत्तर; म्हणाला! “यामुळे कदाचित तुमचा…”
- सोनिया गांधींना ईडीच्या नोटीसीनंतर भाजप नेत्याचा मोठा खुलासा; म्हणाले, “2019 मध्ये ईडीने…”
- काँग्रेसचा ‘हात’ सोडल्यानंतर भाजपमध्ये पटेलांचं ‘हार्दिक’ स्वागत! गांधीनगर येथे पक्षप्रवेश
- SL vs AUS 2022 : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ ‘प्रशिक्षका’विना पोहोचला श्रीलंकेत; ६ वर्षानंतर खेळणार यजमानांसोबत मलिका
- “जेवढं शक्य होतं तितकं…”, जीएसटीवरील भाजपच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
