Share

VIDEO : 6,6,6,6,6,4..! कॅप्टन बनताच बेन स्टोक्सनं दाखवलं रौद्ररुप; एका षटकार ठोकले पाच षटकार!

Published On: 

मुंबई : इंग्लंडचा कसोटी कर्णधार बनल्यानंतर अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) धमाकेदारपणे मैदानात परतला आहे. काऊंटी क्रिकेटमध्ये डरहमकडून खेळताना या अष्टपैलू खेळाडूने आपल्या पहिल्याच सामन्यात शानदार फलंदाजी केली आणि अवघ्या ६४ चेंडूत धडाकेबाज शतक झळकावले. त्याने वूस्टरशायरचा डावखुरा फिरकी गोलंदाज जोश बेकरच्या एका षटकात सलग पाच षटकार मारून आपले शतक पूर्ण केले आणि त्यानंतर षटकात एक चौकार मारून एकूण ३४ धावा वसूल केल्या. उपाहारापर्यंत स्टोक्सने ८२ चेंडूत १४७ धावा केल्या होत्या.

बेन स्टोक्सने डावाच्या सुरुवातीला सावध खेळ करत ४७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले पण पुढील ५० धावांसाठी त्याने केवळ १७ चेंडू खेळले. अलीकडेच जो रुट कसोटी कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर बेन स्टोक्सची इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. स्टोक्सने कसोटीतील त्याच्या फलंदाजीच्या क्रमाबद्दल सांगितले, की वर्कलोडमुळे तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल.

इंग्लंडने रुटच्या नेतृत्वातील शेवटच्या १७ कसोटी सामन्यांत फक्त एकच विजय मिळवला होता. मानसिक आरोग्याच्या कारणांमुळे विश्रांती घेतल्यानंतर स्टोक्सने अलीकडेच संघात पुनरागमन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!