मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये राजस्थान रॉयल्सचे जोस बटलर आणि युझवेंद्र चहल तगड्या फॉर्मात आहेत. या दोघांची मैत्रीही चर्चेचा विषय ठरते आहे. नुकताच दोघांचा एक डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला. यात दोघांनी बल्ले-नी-बल्ले गाण्यावर ठेका धरला. काही स्टेप्स एकत्र केल्यानंतर दोघांनी चहलची आयकॉनिक पोज दिली, ज्याला चाहत्यांनी पसंती दिली आहे.
या डान्सनंतर चहल आणि बटलरने २०१९ विश्वचषकातील सर्वात लोकप्रिय व्हायरल मीमसाठी पोझ दिली. २०१९च्या वर्ल्डकपमध्ये युझवेंद्र चहलचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो सीमारेषेवर आरामात पडलेला दिसत होता. चहलने जेव्हा आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेतली तेव्हा त्याने अशी पोज देऊन सेलिब्रेशन केले.
Jos & Yuzi. Together. Dancing to Balle ni Balle. ????????
Is this the best collab of the season? ???? #RoyalsFamily | @yuzi_chahal | @josbuttler pic.twitter.com/KqITBfozSt
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 6, 2022
राजस्थान रॉयल्सने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. चहलची पत्नी धनश्री वर्मा आणि बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराणा यांनी बल्ले-नी-बल्ले गाण्यावर डान्स केला आहे. युझवेंद्र चहल आणि जोस बटलर मैदानावर आणि मैदानाबाहेर चांगले मित्र आहेत. दोघांमधील मजेदार संभाषणाचे काही व्हिडिओ यापूर्वीही समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये चहलने जोसला विचारले की तू माझ्यासोबत ओपनिंग करशील का? हा प्रश्न ऐकून बटलरला हसू आवरता आले नाही.
सध्याच्या आयपीएलमध्ये जोस बटलर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे, तर युझवेंद्र चहलने सर्वाधिक बळी घेतले. बटलरने १० सामन्यात तीन शतके आणि अर्धशतकांच्या जोरावर ५८८ धावा केल्या. चहलने १० सामन्यात १९ विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

