Share

राज ठाकरेंच्या दौऱ्याला भाजप खासदाराचा विरोध! चलो अयोध्या महाअभियानाला आवाहन

Published On: 

लखनऊ : भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना अपमानित केल्याबद्दल माफी मागावी, अशी भूमिका ब्रिजभूषण शरण सिंह यांनी २ दिवसांपूर्वी घेतली असल्याने आता यांच्यातील विरोध शिगेला पोचले आहेत. आता ब्रिजभूषण शरण सिंह यांनी फेसबुक पोस्ट करत आणखी कडाडून विरोध केला आहे.

राज ठाकरेंच्या दौऱ्याचा विरोध करण्यासाठी ५ जूनला चलो अयोध्या महाअभियान आयोजित करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी उत्तर भारतीयांचा अपमान सहन केला जाणार नाही. ५ जूनला अयोध्येला जायचं असल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी चलो अयोध्या महाअभियानाला पाठिंबा देण्यासाठी आवाहन त्यांनी केलं आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या विरोधातील भूमिका कायम ठेवली आहे. तसेच उत्तर भारतीयांना अपमानित करणाऱ्या राज ठाकरे यांच्या विरोधात माफी मागा अन्यथ माघारी जा या अभियानाला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचंही सांगितलं आहे. यासह फेसबुकवर एक पोस्ट लिहून पोस्टर देखील शेअर केले आहे.

https://www.facebook.com/brijbhushansharan/posts/547224816763412

 

राज ठाकरेंनी हात जोडून तमाम उत्तर भारतीयांची माफी मागावी –

 

“उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना अयोध्येच्या सीमेत घुसू देणार नाही. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून तमाम उत्तर भारतीयांची माफी मागावी.”, असे ट्वीट खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केले आहे. तसेच जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागत नाहीत, माझी विनंती आहे तोपर्यंत मुख्यमंत्री योगीजींनी राज ठाकरेंना भेटू नये. राम मंदिर आंदोलनापासून मंदिर उभारणीपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि सर्वसामान्यांची भूमिका सारखीच राहिली आहे. ठाकरे कुटुंबीयांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. असेही ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!