🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने इंग्लंडविरुद्धच्या (ENG vs IND) तिसऱ्या टी-२० सामन्यात जबरदस्त शतक झळकावले. या खेळीनंतर त्याने ट्वीट करून मोठी प्रतिक्रिया दिली आहे. नॉटिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने भारताचा १७ धावांनी पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून २१५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ ९ गडी गमावून १९८ धावाच करू शकला. भारतीय संघासाठी सूर्यकुमार यादवने जबरदस्त शतक झळकावले मात्र उर्वरित फलंदाजांची साथ न मिळाल्याने तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या पराभवानंतरही भारतीय संघाने मालिका २-१ अशी जिंकली आहे.
Ending the series with a special knock ????????
Onwards & Upwards ???? pic.twitter.com/nRLut2wvMq— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) July 10, 2022
लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. पॉवरप्लेमध्येच संघाने ३ विकेट गमावल्या. यानंतर सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरने डावाची धुरा सांभाळत धावसंख्या १५० धावांपर्यंत नेली. या सामन्यात सूर्यकुमारने भारतीय संघाला एकहाती खिंडार ठेवले. त्याने ५५ चेंडूत १४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ११७ धावांची शानदार खेळी खेळली. १९व्या षटकात तो मोठा फटका खेळून बाद झाला आणि त्यामुळे टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. सूर्यकुमार यादवच्या या खेळीचे खूप कौतुक होत असून त्याने स्वतः याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ”मी ही मालिका एका खास खेळीने संपवली”, असे सूर्यकुमारने म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
