Share

Shiv Sena MP | शिवसेनेला मोठा धक्का! आमदारांनंतर खासदार देखील बंडाच्या तयारीत?

Published On: 

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंड करत राज्यात भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेनेला मोठा झटका बसला. शिवसेनेत आता १५ आमदार उरले आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार देखील बंडाच्या तयारीत आहेत. शिवसेनेचे १९ पैकी १४ लोकसभेचे खासदार हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे स्वतंत्र गट म्हणून मान्यता मागण्याची शक्यता आहे, अशी माहिती द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या हेतूने ही मागणी १३ किंवा १४ जुलैला केली जाऊ शकते, अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

यापूर्वी दिल्लीत खासदारांची एक बैठक झाली होती. ज्यामध्ये खासदारांनी उद्धव ठाकरेंवर भाजपसोबत युती करण्यासाठी दबाव आणला होता. शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की, आम्ही उद्धव ठाकरेंकडे आमची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत लवकरच बैठक होणार असून, त्यानंतर खासदार आपली भूमिका ठरवतील. शिवसेना खासदार संजय मंडलिक म्हणाले की, खासदारांमध्ये फूट पडल्याची बातमी अफवा आहे. एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र आणि इतर एक-दोन खासदार वगळता सर्व खासदार पक्षाशी एकरूप आहेत.

आज शिवसेना खासदारांची उद्धव ठाकरेंसोबत बैठक

आज शिवसेना खासदारांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक आहे. या बैठकीत राष्ट्रपती निवडणूकीवर चर्चा होणार असल्याची चर्चा आहे. तसचे खासदारांच्या भावना देखील उद्धव ठाकरे जाणून घेणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!