Share

Breaking News : १६ आमदारांच्या याचिकेसाठी कोर्ट खंडपीठ नेमणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील मोठ्या सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर पक्षातील अनेक आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. यानंतर हे प्रकरण आता न्यायालयात पोहचले आहे. दोन्ही बाजूंकडून न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. शिवसेनेने केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

शिवसेनेच्या अपात्रतेची कारवाईला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेतेपदी नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिका शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात केल्या असून यावरच आज ११ जुलै रोजी सुनावणी निश्चित केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयातील सोमवारच्या कामकाजात या प्रकरणाचा समावेश नसल्याने ही सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेनेच्या याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. मात्र यामध्ये बराचसा वेळ जाऊ शकतो. सुनावणी पुर्ण होईपर्यंत आमदारांचं निलंबन नाही. खंडपीठ नेमण्यासाठी वेळ लागणार आहे. यानंतर १६ आमदारांच्या याचिकेसाठी कोर्ट खंडपीठ नेमणार आहे.

दरम्यान, असे असतानाच दुसरीकडे विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी शिवसेना आणि शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे या आमदारांना 7 दिवसांमध्ये उत्तर द्यावे लागणार आहे. यावेळी शिवसेना कोणाची हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची हा सवाल उपस्थित झाल्याने नोटीस बजावलेल्या आमदारांना 17 जुलैपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!