Share

Sharad Pawar : अजित पवारांचे बंड मोडण्यात यश मग उद्धव ठाकरे अपयशी का?; शरद पवार म्हणाले…

Published On: 

मुंबई:  नोव्हेंबर २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकींनंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेली बंडखोरी मोडून काढण्यात शरद पवारांना यश आलं होतं मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी केलेली बंडखोरी मोडून काढण्यात उद्धव ठाकरेंना अपयश आले आहे. यावरच शरद पवारांना (Sharad Pawar) औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता.

शरद पवारांनी सध्याची स्थिती आणि तेव्हाची स्थिती वेगळी होती असे म्हणत आमच्यात काही झालच नव्हतं. जे गेले त्या लोकांवर आमचं नियंत्रण नव्हतं. आमच्यात काही घडलं असतं तर तुमच्या प्रश्नाला उत्तर देता आलं असतं. असे शरद पवारांनी म्हटले आहे.

तसेच आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नव्हते. त्यावेळी जे घडलं ते सारं अचनाक घडलं होतं. आणि शिवसेनेनी पुकारलेला बंड हा वैचारिक मतभेदामधून असल्याचेही पवारांनी म्हटले. दरम्यान उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्ष वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला असून यावर आज कोर्टात सुनावणी सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!