Share

ENG vs IND : “इंग्लंडविरुद्ध भारताचे गोलंदाज यशस्वी ठरले, कारण…”, सिराजनं दिलं ‘असं’ उत्तर!

Published On: 

मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सांगितले की, इंग्लंडविरुद्धच्या (ENG vs IND) कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज आणि न्यूझीलंडच्या गोलंदाजांमध्ये काय फरक आहे. किवी गोलंदाज तेवढा प्रभाव पाडू शकले नाहीत, तर भारतीय गोलंदाज यशस्वी का झाले, हे सिराजने स्पष्ट केले. सिराजच्या मते, भारतीय गोलंदाजांचा वेग जास्त आहे आणि ही गोष्ट किवी संघाकडे नाही.

अलीकडेच इंग्लंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा ३-० असा पराभव केला. या मालिकेदरम्यान इंग्लिश फलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्ससारख्या खेळाडूंनी अतिशय आक्रमक फलंदाजी केली. मात्र, भारताविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटी सामन्यात इंग्लिश फलंदाजांना तशी फलंदाजीही करता आली नाही. बेअरस्टोने नक्कीच शानदार शतक झळकावले पण बाकीचे फलंदाज धावा काढण्यासाठी धडपडत होते.

सिराज म्हणाला, ”जर आपण न्यूझीलंड मालिकेवर नजर टाकली तर त्यांच्याकडे १४० किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करू शकणारे गोलंदाज नव्हते परंतु आमच्याकडे असे गोलंदाज आहेत. याशिवाय गेल्या वर्षी आम्ही इंग्लंडविरुद्धही खेळलो होतो. त्यामुळे आमच्यासाठी तो प्लस पॉइंट होता. आम्हाला इंग्लंडच्या कमकुवतपणाची जाणीव होती आणि त्यामुळेच आम्ही यशस्वी झालो.”

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!