मुंबई : इंग्लंडविरुद्ध (ENG vs IND) सुरू असलेल्या पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही विराट कोहलीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. २० धावांवर असलेल्या विराटला बेन स्टोक्सने बाद केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात ३ बाद १२५ धावा केल्या होत्या. चेतेश्वर पुजारा ५० आणि ऋषभ पंत ३० धावा करत खेळत आहे. अशा प्रकारे संघाची एकूण आघाडी २५७ धावांवर गेली आहे. भारताने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या होत्या तर इंग्लंडने २८४ धावा केल्या होत्या. अशा प्रकारे टीम इंडियाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने पुढे आहे.
रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने चौकार मारून खाते उघडले. पण बेन स्टोक्सचा एक उसळता चेंडू त्याला समजू शकला नाही. बॅटची बाहेरची कड घेत चेंडू यष्टीरक्षक सॅम बिलिंग्सकडे गेला. बॉल त्याच्या हातात आला नाही. पण पहिल्या स्लिपला उभ्या असलेल्या रूटने एका हाताने कोहलीचा शानदार झेल टिपला. स्टोक्सने कोहलीला सहाव्यांदा बाद केले.
Word – Unlucky
Synonym – Virat Kohli ????#INDvENG #ViratKohli pic.twitter.com/1Kilg57epC— Shivam Jaiswal ???????? (@7jaiswalshivam) July 3, 2022
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेत विराट कोहली शेवटच्या वेळी फलंदाजीसाठी आला होता. तीन वर्षांपासून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. त्याला मालिकेतील ९ डावात २४९ धावा करता आल्या. यादरम्यान त्याने दोन अर्धशतके झळकावली. ५५ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. यादरम्यान त्याला एकही षटकार मारता आला नाही. दुसरीकडे, ऋषभ पंत, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी मालिकेत ३०० हून अधिक धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

