Share

Ajit Pawar : “अडीच वर्षाच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते झाले”; अजित पवारांचा खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज राज्य विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज झालेल्या बहुमत चाचणीत शिंदे गट आणि भाजप सरकारने बहुमत चाचणी पास केली. 164 पेक्षा जास्त मते शिंदे गट आणि भाजपला मिळाली. यानंतर अधिवेशनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात बोलताना तुफान फटकेबाजी केली.

अजित पवार बोलताना म्हणाले कि, संपूर्ण सभागृहात या सगळ्या आमदारांमध्ये सगळ्यात नशीबवान कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहे. ते मुख्यमंत्री पण झाले, उपमुख्यमंत्री पण झाले आणि विरोधी पक्ष नेतेही झाले. सगळी महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली. आताही कुणाला वाटलंही नव्हतं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. फडणवीसांनी तीन चार वेळा सतत शिवसैनिक म्हणून उल्लेख केला. हे सारखं सारखं का सांगावं लागतंय. याच देखील तुम्हाला आत्मपरीक्षण करावं, असं देखील पवार म्हणाले.

दरम्यान, फडणवीस म्हणाले कि, मविआ सरकार अनैसर्गिक आहे, ते टिकणार नाही, मी कविता म्हटली होती की मी पुन्हा येईन, त्यावरही माझी टिंगल उडवली, पण मी आलो, एकटा नाही आलो, शिंदेंना सोबत घेऊन आलो. ज्यांनी माझी टिंकल टवाळी केली, त्यांचा मी बदला घेणार आहे. बदला हा आहे, की मी त्यांना माफ केलंय. प्रत्येकाची वेळ येते, असं ते म्हणाले. यानंतर पुढे दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, काच के खिलोने हवा मे उछाले नहीं जाते.. कोशिश करने से हर मुश्लिल होती है आसान, तकदीर के भरोसे काम टाले नहीं जाते.., असा शेर देखील फडणवीसांनी बोलून दाखवला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!