🕒 1 min read
मुंबई : आज राज्य विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज झालेल्या बहुमत चाचणीत शिंदे गट आणि भाजप सरकारने बहुमत चाचणी पास केली. 164 पेक्षा जास्त मते शिंदे गट आणि भाजपला मिळाली. यानंतर अधिवेशनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात बोलताना तुफान फटकेबाजी केली.
अजित पवार बोलताना म्हणाले कि, संपूर्ण सभागृहात या सगळ्या आमदारांमध्ये सगळ्यात नशीबवान कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहे. ते मुख्यमंत्री पण झाले, उपमुख्यमंत्री पण झाले आणि विरोधी पक्ष नेतेही झाले. सगळी महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली. आताही कुणाला वाटलंही नव्हतं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. फडणवीसांनी तीन चार वेळा सतत शिवसैनिक म्हणून उल्लेख केला. हे सारखं सारखं का सांगावं लागतंय. याच देखील तुम्हाला आत्मपरीक्षण करावं, असं देखील पवार म्हणाले.
तसेच 4 जुलै पर्यंत विश्वासदर्शक ठराव करण्यासाठी मुदत दिली होती. त्याप्रमाणे तुम्ही ते केलंय. तसेच शिवसेनेच्या नेत्याबरोबर शिवसैनिक जात नाही, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. येणाऱ्या निवडणुकीत काय ते स्पष्ट होईल. 40 आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होते, 106 आमदार असलेली उपमुख्यमंत्री होते, यात नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे, अशी शंखा देखील अजित पवार यांनी उपस्थित केली.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
