Share

ENG vs IND : तिसऱ्या दिवसअखेर भारताकडं दमदार आघाडी; पुजाराचं अर्धशतक!

Published On: 

मुंबई : एजबॅस्टन येथे खेळल्या जात असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या (ENG vs IND) पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने दुसऱ्या डावात ३ विकेट गमावून १२५ धावा केल्या आहेत. भारताकडे एकूण २५७ धावांची आघाडी आहे. ऋषभ पंत ३० आणि चेतेश्वर पुजारा ५० धावांवर खेळत आहेत.

तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २८४ धावांवर ऑलआऊट झाला. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक १०६ धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय सॅम बिलिंग्सने ३६, जो रूटने ३१ आणि बेन स्टोक्सने २५ धावा केल्या. भारतीय वेगवान गोलंदाजांसमोर इंग्लंडचे फलंदाज मुक्तपणे धावा करू शकले नाहीत. मोहम्मद सिराज हा सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला. त्याने ४ विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराहने 3३ मोहम्मद शमीने २ आणि शार्दुल ठाकूरने एक बळी घेतला.

पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी घेत पुन्हा फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात अँडरसनच्या चेंडूवर शुबमन गिलला जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद केले. यानंतर पुजाराने एका बाजूने किल्ला लढवला. हनुमा विहारी (११) आणि विराट कोहली (२०) अपयशी ठरले. त्यानंतर पुजारा आणि पंतने डावाची धुरा सांभाळली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. यानंतर पुजाराने १३९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने ५ चौकार मारले. हे त्याचे इंग्लंडमधील पाचवे आणि कारकिर्दीतील ३३वे अर्धशतक आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!