🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेतील आमदार व एकनाथ शिंदे गटातील आमदार पहिल्यांदाच आज विधानसभेत समोरासमोर आले. मागील काही काळापासून विधानसभेचे अध्यक्ष पद रिक्त होते. त्यामुळे आज दोन दिवशीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. हे निवडणूक नव्या नियमानुसार आवाजी पद्धतीने घेतली गेली. यामध्ये शिंदे-फडणवीस सरकारकडून भाजपचे राहुल नार्वेकर यांचा १६४ मतासह विजय झाला. तर दुसरीकडे महाविकास आघाडी कडून शिवसेनेचे राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली. राहुल नार्वेकर हे देशातील सर्वात कमी वयात विधानसभा अध्यक्ष बनले आहेत.
अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन करताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार टोलेबाजी केली. अजित पवार म्हणाले, “कुणी काहीही म्हटलं तरी सगळ्यांच्या मनात धाकधूक धाकधूक आहे. भाजपाचे १०५ आमदारांनी आपल्या सदसदविवेक बुद्धीला स्मरून विचारा की जे घडलंय त्याने आपलं समाधान झालं आहे का? चंद्रकांत पाटील यांनी यावर बाकडं वाजवू नये. तुमचं मंत्रीपदच येईल की नाही सांगता येत नाही. कुठं बाकडं वाजवताय? शिवसेनेतून तिकडे गेलेल्या ३९ लोकांपैकी किती लोकांना मंत्रिपद मिळणार आहे? सगळ्यांना वाटतंय मिळेन. काय होईल काही सांगता येत नाही.”
अजित पवार म्हणाले की, “फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री जाहीर करताच अनेक भाजपा नेते रडू लागले. गिरीश महाजन तर डोक्यावरचा फेटा डोळ्यावर बांधून अश्रू पुसत आहेत. एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात जरी सांगितलं असतं तर मीच उद्धव ठाकरेंशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं”.
“गिरीश महाजन यांचं तर अजूनही रडणं बंद होईना. त्यांना फेटा बांधायला दिला तर त्यांनी फेटा सोडून डोळ्याला आलेलं पाणी पुसण्यासाठी फेट्याचा वापर करत आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याचं फारच वाईट वाटलं,” असं म्हणत अजित पवारांनी गिरीश महाजन यांना टोला लगावला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
