🕒 1 min read
मुंबई : भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यात एजबॅस्टन येथे पाचवी कसोटी खेळली जात आहे. या कसोटीचे पहिले दोन दिवस भारतासाठी चांगले ठरले. तिसऱ्या दिवशी इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. जॉनी बेअरस्टोने दमदार शतक ठोकले. शिवाय तो आणि बेन स्टोक्स यांच्यात पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. तिसऱ्या दिवशीही विराट कोहली फुल अॅक्शनमध्ये दिसला. त्याची मैदानावर बेअरस्टोसोबत शाब्दिक चकमक झाली. हावभावांमध्ये कोहलीने बेअरस्टोला तोंड बंद करून फलंदाजी करण्यास सांगितले. वाद वाढत गेल्याने पंचांना हस्तक्षेप करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोहली आणि बेअरस्टो यांच्यातील हा संपूर्ण वाद इंग्लंडच्या डावाच्या ३२ व्या षटकात झाला. मोहम्मद शमी गोलंदाजी करत होता. शमीच्या अचूक लाइन लेन्थमुळे बेअरस्टो चांगलाच अडचणीत आला होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बेअरस्टोला फटका बसला. हा चेंडू पटकन आत आला आणि स्टंपच्या वरून गेला. बेअरस्टो थोडक्यात बचावला. यानंतर स्लिपमध्ये उभ्या असलेल्या कोहलीने बेअरस्टोविरुद्ध स्लेजिंग करण्यास सुरुवात केली. बेअरस्टो चेंडू सोडून सर्व काही पाहू शकतो, असा टोला विराटने लगावला.
It's tense out there between Virat Kohli and Jonny Bairstow ????#ENGvIND pic.twitter.com/3lIZjERvDW
— Sky Sports Cricket (@SkyCricket) July 3, 2022
https://twitter.com/AbhayThakur981/status/1543539804347850752?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1543539804347850752%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-virat-kohli-involved-in-heated-exchange-with-jonny-bairstow-said-shut-up-and-just-stand-and-bat-watch-viral-video-4364814.html
बेअरस्टोने कोहलीला गप्प बसण्यास सांगितले. यानंतर कोहली त्याच्याजवळ पोहोचला आणि दोघांमध्ये भांडण सुरू झाले. प्रकरण वाढत असल्याचे पाहून पंचांनाही यावे लागले. त्यानंतर दोघेही शांत झाले. पण, स्लिपकडे जात असताना कोहलीने बेअरस्टोला तोंड बंद ठेवण्याचा इशारा केला आणि शांतपणे फलंदाजी करण्यास सांगितले. या वादानंतर बेअरस्टोने शतक ठोकले.
जॉनी बेअरस्टो २०२२ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याच्याआधी उस्मान ख्वाजाच्या नावावर ८२२ धावा होत्या. आठवा कसोटी सामना खेळत असलेल्या बेअरस्टोने ८८० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर इंग्लिश संघाने फॉलोऑनही वाचवला आहे. १४० चेंडूत १०६ धावा केलेल्या बेअरस्टोला मोहम्मद शमीने बाद केले. विराट कोहलीने त्याचा झेल घेतला. इंग्लंडचा पहिला डाव ६१.३ षटकात २८४ धावांवर आटोपला.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
